बालकांड अध्याय ६
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड ॥ अध्याय सहावा ॥ श्रीरामजन्मप्रसंग ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचा जन्मकाळ : श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव । पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥ संत एकनाथ महाराज सांगतात श्रीरामांच्या जन्माचा प्रभाव म्हणून देव लोक, मनुष्य समुदाय सगळेच ज्याला जन्म नाही अशा अजन्मा असलेल्या श्रीरामांच्या जन्माचं आश्चर्य पहायला आले. प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं । विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥ माता कौसल्येच्या प्रसुतीची वेळ आली तेव्हा आयौध्येच्या परिसरात सगळीकडे आकाशात विमानांची दाटी झाली सर्व देव लोक लगबगीनं लवकर आले. सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य । लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥ आपल्या वंशात भगवान जन्माला येणार आहेत याचा आनंद झाल्याने सुर्य डोक्यावर येतो तेच श्रीरामाचे जन्म मुहूर्त आहे. वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण । केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥ प्रत्येक ग्रह ज्या स्थितीत माणसाला अनुकूल असतात त्या अनुकूल र...