Posts

बालकांड अध्याय ६

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड ॥ अध्याय सहावा ॥ श्रीरामजन्मप्रसंग ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामाचा जन्मकाळ : श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव । पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥ संत एकनाथ महाराज सांगतात श्रीरामांच्या जन्माचा प्रभाव म्हणून देव लोक, मनुष्य समुदाय सगळेच ज्याला जन्म नाही अशा अजन्मा असलेल्या श्रीरामांच्या जन्माचं आश्चर्य पहायला आले. प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं । विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥ माता कौसल्येच्या प्रसुतीची वेळ आली तेव्हा आयौध्येच्या परिसरात सगळीकडे आकाशात विमानांची दाटी झाली सर्व देव लोक लगबगीनं लवकर आले. सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य । लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥ आपल्या वंशात भगवान जन्माला येणार आहेत याचा आनंद झाल्याने सुर्य डोक्यावर येतो तेच श्रीरामाचे जन्म मुहूर्त आहे. वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण । केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥ प्रत्येक ग्रह ज्या स्थितीत माणसाला अनुकूल असतात त्या अनुकूल र...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ५

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड ॥ अध्याय पाचवा ॥ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन । डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥ कथेचे अनुसंधान असे की मागच्या अध्यायात कौसल्येने डोळे उघडले की लगेचच राजा डोहाळे विचारण्यासाठी सावधान झाला. कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी । दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥ २ ॥ कौसल्येच्या गर्भात प्रभू श्रीराम असल्यामुळे कौसल्या श्रीरामस्वरुपावर आहे व राजा संसारींक प्रवृत्तीने पुत्रलोभार्थी आहे या प्रेमपुर्वक दोघांचा संवाद व डोहाळे ऐका. राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें । वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥ राजा दशरथ म्हणतो हे प्रिये तुला काय आवडते,तुझे डोहाळे काय आहे ते मला कोणताही संभ्रम न ठेवता सांग.  येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम । अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥ राजाचे बर बोलणे ऐकून कौसल्या बोलू लागली मी संपुर्ण राम आहे माझ्यात कशाचा भ्रम?मी पुरुषोत्त...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ४

  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड॥ अध्याय चवथा ॥ ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥कौसल्येचे डोहाळे : जय श्रीराम ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण । नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥ मागच्या अध्यायातील कथा ऐकल्यानंतर अनेक ग्रंथ वाचण केलेले श्रोते म्हणतील की हि कथा मुळग्रंथातील नाही त्यांनी ज्ञानी जनांनी शिवरामयण पहावे असे ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात.  स्कंद पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती । राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥ कार्तिक स्वामींनी अगस्तीऋषींना प्रश्न केला की माझे आईवडील रामनाम जपतात तो श्रीराम या जगतात कोण आहे त्याची संपुर्ण स्थिती मला सांगा असा प्रश्न केला.  तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥ त्यावेळी अगस्तीऋषी म्हणतात श्रीरामांचे वर्णन करण्यासाठी मी सामान्य आहे ज्या श्रीरामाचे वर्णन वेद करू शकला नाही तो सुध्दा मौन झाला ते वर्णन करण्यासाठी माझ्या मुखामध्ये सामर्थ्य नाही असे म्हणतात.  तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३

Image
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड॥ अध्याय तिसरा ॥ ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी । तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥ ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात कैकयीचा भाग घारीने नेल्यानंतर माता कैकयी अतिशय दु:खी झाल्या असताना कौशल्यामाता कैकयी ला पोटाला धरून समजूत घालत आहेत. तु विनाकारण का दु:खी होत आहेस तुझे आणि माझे सुख आणि दु:ख एकच आहे.  एकोदरा सख्या बहिणी ।दोघी पर्णिजे दोघींजणी/त्यांसी काही नाही मिळतील/दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥ आपण खऱ्या अर्थाने बहिणी आहोत ज्या एका पटातून जन्मतात पण दोघींना दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या असतात.  दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।  दोघीं  नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥ दोघींची कधीच गाठभेट होत नाही सतत चर्चा होत नाहीत एकमेकींना कधी दिसत नाहीत त्यामुळे त्यांच्या सखेपणाच्या गोष्ठी खोट्या आहेत. आपल्या दररोज भेटी होतात असे माता कौशल्या माता बोलतात.  दोघी नाही नित्...