Posts

Showing posts from January, 2025

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ४

  ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड॥ अध्याय चवथा ॥ ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥कौसल्येचे डोहाळे : जय श्रीराम ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण । नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥ मागच्या अध्यायातील कथा ऐकल्यानंतर अनेक ग्रंथ वाचण केलेले श्रोते म्हणतील की हि कथा मुळग्रंथातील नाही त्यांनी ज्ञानी जनांनी शिवरामयण पहावे असे ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात.  स्कंद पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती । राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥ कार्तिक स्वामींनी अगस्तीऋषींना प्रश्न केला की माझे आईवडील रामनाम जपतात तो श्रीराम या जगतात कोण आहे त्याची संपुर्ण स्थिती मला सांगा असा प्रश्न केला.  तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥ त्यावेळी अगस्तीऋषी म्हणतात श्रीरामांचे वर्णन करण्यासाठी मी सामान्य आहे ज्या श्रीरामाचे वर्णन वेद करू शकला नाही तो सुध्दा मौन झाला ते वर्णन करण्यासाठी माझ्या मुखामध्ये सामर्थ्य नाही असे म्हणतात.  तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३

Image
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड॥ अध्याय तिसरा ॥ ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी । तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥ ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात कैकयीचा भाग घारीने नेल्यानंतर माता कैकयी अतिशय दु:खी झाल्या असताना कौशल्यामाता कैकयी ला पोटाला धरून समजूत घालत आहेत. तु विनाकारण का दु:खी होत आहेस तुझे आणि माझे सुख आणि दु:ख एकच आहे.  एकोदरा सख्या बहिणी ।दोघी पर्णिजे दोघींजणी/त्यांसी काही नाही मिळतील/दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥ आपण खऱ्या अर्थाने बहिणी आहोत ज्या एका पटातून जन्मतात पण दोघींना दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या असतात.  दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।  दोघीं  नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥ दोघींची कधीच गाठभेट होत नाही सतत चर्चा होत नाहीत एकमेकींना कधी दिसत नाहीत त्यामुळे त्यांच्या सखेपणाच्या गोष्ठी खोट्या आहेत. आपल्या दररोज भेटी होतात असे माता कौशल्या माता बोलतात.  दोघी नाही नित्...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय २

Image
  श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥बालकाण्ड॥ अध्याय दुसरा ॥ ॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥ यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥ राजाने सर्व राष्ट्र पाहिले तर राष्ट्रातील सर्व द्वंद्वदु:ख दुष्काळ संपला सगळीकडे सुकाळ झाला ज्या वृक्षाला फळ लागत नव्हते त्याला सुध्दा फळे लागू लागली.  प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर । याग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥ प्रजा आनंदाने निर्भयपणे विचरत आहे गाई ब्राम्हणांत आनंद आहे घरोघरी द्विजवर होमहवन, यज्ञ करु लागले.  पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥ पृथ्वी धनधान्याने परिपुर्ण झाली, कोणालाही दु:ख दैन्य नाही कारण घरोघरी वेदाच अध्ययन सुरु आहे. भगवंताच्या किर्तीच वर्णन सुरु आहे म्हणून सर्वजण सुखी होती.  भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥ भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतार घेणार आहेत म्...

भावार्थ रामायण बालकांड अध्याय १

Image
 भावार्थ रामायण बालकांड अध्याय १ ॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ बालकाण्ड ॥ अध्याय पहिला ॥ ॥ श्रीसद्‌गुरवे रामचंद्राय नमः ॥ श्रीगणेश वंदन ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥ जय श्रीराम जय हनुमान  ग्रंथ कर्ते संत एकनाथ महाराज ग्रंथ सुरुवातीला श्रीगणेशाला वंदन करत आहेत ओमकार रूप असलेले गणेश ज्याच्या कोणीही आदी नाही, ज्याने वेद व वेदातांचे प्रतिपादन केले आहे, जो वंदनाच्या दृष्ठिने पाहिले तर परम वंदनीय आहे ज्याच कोणीही प्रतिपादन करू शकत नाही असा स्वसंवेद्य असलेल्या गणेशाला माझे वंदन ....  तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥ हे गणराया तुमचे रुप विशिष्ठ असे आहे म्हणून त्याची कल्पना करता येत नाही कारण कल्पित गोष्टि या नाशवान असतात व तुम्ही अविनाशी असे निर्गुण( अरुप ) आहात. त्याअरुपाला भक्तिभावाने साकार समजून अवयवांची कल्पना करुन भजन केले तर अंत असलेल्या कल्पित भावनेचा लोप होऊन अनंत असलेल्या तुमच्या स्वरुपाची प्राप्ती  भक्ताला होते..  यालागीं जैसा अससी त...